Some Universal truth | काही वैश्विक सत्य

जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती आपोआप आपल्यापासून दूर जाते, हरवते किंवा नष्ट होते. विश्वाकडून तशी परिस्थिती निर्माण केली जाते आणि त्या प्रवाहात आपण ओढले जातो हे एक Universal Truth म्हणजेच सृष्टीचा एक नियम आहे.

  • न आवडणारा मित्र, जीवनसाथी, प्रेमी, नातेवाईक आपोआप दुरावले जातात.
  • न आवडणारी वस्तू कालांतराने आपोआप हरवते, फुटते, विकली जाते, फेकून दिली जाते, दुसऱ्याला दिली जाते किंवा नाश पावते.
  •  न आवडणारी वाईट सवय, दुर्गुण निघून जातो, कारण त्यावर आपण मनापासून मात करतो.
  • न आवडणारी नोकरी, व्यवसाय लवकर सुटतात.
  •  न आवडणाऱ्या विषयात कमी मार्कस पडतात. न आवडणारे पाळीव प्राणी जवळही येत नाही.
  • न अवडनारं शरीर लवकर व्याधीग्रस्त होते कारण आपले तिकडे दुर्लक्ष होते.
  •  न आवडणारी श्रीमंती आणि पैसा निघून जातो.( उदा. पैशाची कदर न करणे किंवा उधळपट्टी )
  • याउलट कंजूष माणसाकडे पैसा टिकतो कारण त्याला तो मनापासून आवडतो, तो पैशावर प्रेम करतो.

मनापासून आवडणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात अधिक अधिक वृद्धिंगत होत जातात मग ते नातं, व्यवसाय, नोकरी, छंद काहीही असो.वरील नाआवडीचा नियम आपल्या जीवनात बऱ्याच वेळा कार्य करतोच. काही अपवाद असतीलही पण अगदी नगण्य.

  गती / SPEED

निसर्ग नियमानुसार प्रत्येक गोष्टीची निर्मिती होण्यासाठी एक ठराविक गती आणि वेळ हवा असतो.. प्रत्येक वस्तूला आपली स्वतःची गती आणि लयबद्धता असतें आणि त्याच प्रमाणे ती उदयास येते किंवा तयार होत असते , पण कधी कधी त्याला मानव निर्मित किंवा निसर्गाकडूनच गती भेटते आणि मग हीच गती नाशाला कारणीभूत होते.

  •  अचानक आलेला पैसा, संपत्ती जास्त काळ टिकत नाही. याउलट हळू हळू केलेली प्रगती दीर्घकाळ टिकून राहते.
  •  रातोरात मिळालेली प्रसिद्धी थोडे दिवसच राहते.
  •  जोराचा पाऊस आणि पूर नुकसानीस आमंत्रण देतो तर रिमझिम पाऊस शेती आणि बागा, फुलवितो.
  •  वेगाचा, जोरदार वाहणारा वारा झाडे, घरे आणि बरेच काही उध्वस्त करतो, विमानाची गतीही कमी करतो. तर मंद वाहणारा वारा आल्हाददायक आणि सुखदायक वाटतो.
  • वेगाने वाढणारी झाडं थोडेच दिवस टिकतात ( मका, ज्वारी ).याउलट सावकाश आणि संथगतीने वाढणारी झाडे मात्र खूप वर्ष टिकून राहतात.उदा. वड, पिंपळ, नारळ
  • नेहमीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने चालणाऱ्या गाड्या अपघातास निमंत्रण देतात तर वेगाने चालणारी यंत्र लवकर झीजतात, लवकर कामावर येतात .
  •  एखाद्या कंपनीत उत्पादन जास्त वेगाने केले की गुणवत्ता बिघडते.
  •  पटकन शिजविलेल्या अन्नाची चव आणि पोषक तत्वे बिगडतात. याउलट मंद गतीने शिजलेले अन्न चवदार आणि पोषक बनते.
  •  हृदयाची गती आणि नाडीचे ठोके वाढले की समजून जायचं शरीरात काहीतरी बिघडलंय.
  •  औषधे गोळया घेऊन कमावलेली बॉडी थोडे दिवस राहते, पण नियमित व्यायामाने कमावलेले शरीर मात्र आयष्यभर साथ देते.
  • मोठया कंपन्यांचे शेअर्स हळू हळू वाढतात आणि गुंतवणूकदाराला दीर्घकाळ रिटर्नस देतात तर छोटया कंपन्यांचे शेअर्स अचानक वर खाली होऊन गुंतवणूकदाराला अडचणीत आणतात.
  •  पटपट खाल्लेलं पचत नाही, पटपट बोललेलं कळत नाही, पटपट वाचलेलं आठवत नाही. पटपट घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकतात.
  •  कमी वेळात जन्म घेणारे प्राणी लवकर मरतात उद्या. किडामुंग्या, फुलपाखरू, उंदीर इत्यादी, तर मातेच्या गर्भात संथ गतीने वाढ होणारे प्राणी दीर्घकाळ जगतात. उदा मानव, हत्ती, गाय,

योग्य त्या वेळेत आणि योग्य गतीने घडलेल्या गोष्टी जास्त परिणामकारक ठरतात आणि दीर्घकाळ टिकून राहतात.