Take a break | थोडासा ब्रेक घ्या 

बऱ्याच वेळा एखादी वस्तू शोधूनही सापडत नाही, एखाद्याचे नाव खुप प्रयत्न करूनही आठवत नाही, काही प्रश्न खुप प्रयत्न करूनही सोडविता येत नाही. तुम्ही एखादा लेख, पत्र, कविता, अर्ज, किंवा पुस्तक लिहायला घेतले आणि काहीच सुचत नाही अशा वेळेस एक काम करा, फक्त थोडासा ब्रेक घ्या , Just take a break. जे काय करता ते सगळं सोडून दया. बाहेर फिरून या ,चहा पाणी घ्या, गाणी ऐका, विनोदी व्हिडीओ पहा, छोटीशी झोप काढा,किंवा स्वतःला दुसऱ्या कामात गुंतवा. हे करत असताना आधीच्या कामाचा विचारही करू नका. थोड्या वेळाने, काही तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी फ्रेश मनाने तुम्ही तेच काम परत हाती घ्याल तेव्हा तुमची समस्या लगेच सुटते किंवा उत्तर लगेच आठवते आणि तरीही समस्या नाही सुटली तर काही दिवसांचा ब्रेक घ्या आणि मग एक दिवस अचानक ध्यानीमनी नसताना आश्यर्यकारकरित्या तुम्हाला उत्तर सापडेल.

दैनंदिन जीवनात तुम्हाला कित्येक वेळा असा अनुभव आला असेल. म्हणतात ना, ” काही प्रश्न सोडून दिले की सुटतात ” ते असे. येथे होते काय की, तुमची अडचण बाह्य मनातून अंतर्मनाकडे जाते आणि अंतर्मन ते ती समस्या सोडविण्याच्या मागे लागते. तुम्ही जरी बाह्य मनाने दुसरे कार्य करीत असाल तरी अंतर्मनाचे शोध कार्य पाठीमागे चालूच असतें. उत्तर मिळताच ते तुमच्या बाह्य मनात पाठविते आणि तुम्हांला उत्तर मिळते.

एखादी वस्तू बनविताना अडचण येतेय, बंद पडलेलं मशीन दुरुस्त करताना नेमका प्रॉब्लेम सापडत नाहीये. एखादे ठिकाण, घर, दुकान खूप शोधून पण सापडत नाहीये. मन पूर्ण पणे गोंधळून जाते, वेळ वाढत जातो आणि गोष्टी अजून चुकत जातात. अशा वेळेस थोडा ब्रेक घ्या, मनाला शांत करा, त्या कामाचा जराही विचार करू नका. थोड्या वेळाने किंवा मोठ्या वेळेचा गॅप घेऊन परत तें काम हाती घ्या, तुमचा प्रॉब्लेम सहज सुटलेला दिसेल किंवा ती अडचण सोडविण्यासाठी कोणाची तरी मदत तुम्हाला मिळते.

प्रत्येकाने अजाणतेपणे असे अनुभव कधी ना कधी घेतले असतील पण आता जाणीवपूर्वक करून पहा, आणि मानसशास्त्राचा चमत्कार अनुभवा.