चिंता करण्याची सवय गेली की ईश्वर मदत करतो ( Stop worrying, God will help you ) या वचनाचा अनुभव मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे कदाचित तुम्हालाही याचा अनुभव कधीतरी आला असेल.काही वर्षांपूर्वी मला एका पुस्तकाचे पान कचऱ्यात सापडले होते आणि त्यावर वरील वाक्य माझ्या वाचण्यात आले . या सत्य वचनाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. जर तुम्ही एखाद्या अडचणीत सापडला आणि ती कशी सोडवायची हे कळतच नाही, परस्थिती तुमच्या हाताबाहेर आहे त्यावेळेस फक्त वरील वाक्य मनोमन म्हणा, प्रार्थना करा आणि त्या समस्येबद्दल विचार करणे सोडून दया. थोडक्यात काय तर ईश्वरावर सगळे सोडून दया आणि निर्धास्त व्हा. एखादी समस्या सोडविणे सर्वशक्तिमान ईश्वराला सहज शक्य असतें. फक्त दृढ विश्वास ठेवा, अगम्य रितीने तुमची समस्या तुम्हाला सुटलेली दिसेल.हाअनुभव तुम्ही स्वतः घेऊन पहा, खुप आश्चर्य वाटेल.
माणसाला उद्याची काळजी असतें आणि त्यासाठी तो धडपडत असतो, चिन्ता करत राहतो. पण प्राणी, कीटक, वनस्पती हे उद्याची चिंता करतात का? उद्यासाठी अन्न,पाणी मिळेल का हा विचार त्यांच्या ध्यानी-मनीही नसतो तरी पण सगळ्यांचे जीवनमान व्यवस्थित चालू असतें. ईश्वर सगळ्यांची काळजी घेतो. कोणालाच उपाशी झोपू देत नाही. प्रत्येक जीव या जगात येण्याअगोदरच सगळी तयारी करून ठेवलेली असतें. मग चिंता कसली ? आपण दररोजच्या जीवनात पाहतो की बिनधास्त जगणारी माणसं अडचणी सहज सोडवितात कारण ते अडचणीचे टेन्शनच घेत नाही आणि बरोबर संकटावर मात करतात.
आपल्याला वाटते या लोकांना परस्थितीचे गांभीर्यच नाही पण त्यांच्यातली सकारात्मक ऊर्जाच त्यांना मार्गदर्शक ठरत असते आणि त्यांना यश देते. तुमचे असे काही मित्र नातेवाईक आठवून पहा म्हणजे तुम्हाला या गोष्टीची खात्री पटेल. याच्या उलट अडचणीची खुप चिंता करणारी मंडळी अजून प्रॉब्लेम मध्ये जाताना दिसतात, खचून जातात आणि परस्थितीला बळी पडतात. इथे काही मानसशास्त्राचे नियमही लागू पडतात, जसे की, समान गोष्टी एकमेकांना आकर्षित करीत असतात . खाली काही दिलेले नियम तुम्हाला पाळावे लागतील तरच खरा अनुभव येईल.
अडचण आल्यावर वरील वाक्य स्वतःशी बोला आणि त्या अडचणीवर परत विचार करु नका. चिंता करणे पूर्ण पणे बंद करा, ईश्वरावर सोपवून दया. स्वतः ला दुसऱ्या कामात गुंतवा म्हणजे विसर पडेल आणि मगच चमत्कार अनुभवायला मिळेल.
काय होईल, कसे होईल हा विचारही मनात आणू नका आणि जर तसें होत असेल तर तुमचे मन ईश्वर शक्तिबद्दल सांशक आहे असा होतो. तुमचा ईश्वरीशक्ती वर भरोसा नाही असाही होतो. परिस्थितीचे नियंत्रन अजूनही तुम्हीच करत आहात असे होते. कंट्रोल स्वतःकडे घेऊ नका. सूर्यास्त झाल्या नंतर सूर्योदय होतो या बद्दल जशी शंका नसते तसाच दृढ विश्वास ठेवा.
वरील प्रयोग करून पहा आणि सराव करा, हळू हळू तुम्हाला अनुभव येऊ लागतील. जेव्हा परस्थिती आपल्या आवाक्याबाहेर आहे किंवा काहीच मार्ग दिसत नाही तेव्हा तर खूप चांगले अनुभव येतील. आणि तुम्हीच म्हणाल – ये तो सच है की भगवान है.. ईश्वराकडे अडचण सोपविल्यानंतर खुश रहा , बिनधास्त रहा, चिंता सोडा आणि पहा काय घडतयं ते…